अमरावती येथे जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना जल्लोषपूर्ण प्रारंभ
जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन अमरावती येथील जिल्हा स्टेडियम येथे करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते पार पडला असून, यावेळी अमरावतीचे पोलीस आयुक्त नरेशचंद्र रेड्डी देखील प्रामुख्याने उपस्थित होते.
या स्पर्धांमध्ये अमरावती जिल्ह्याच्या सर्व महसूल उपविभागांतील कर्मचाऱ्यांसाठी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, 400 मीटर रनिंग रिले, बॅडमिंटनसारखे खेळ, तसेच इंदोर व आउटडोर गेम्सचा समावेश आहे.कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व उपविभागीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. खेड्या-मधल्या वातावरणात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याने स्पर्धांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर निवडणूक प्रक्रियेतील ताण कमी करण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यातील सहकार्याची भावना वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.