लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेचा केला गेम, शिरसगाव कसबा गावातील घटना
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेला रागाच्या भरात कायमचे संपविण्याची खळबळजनक घटना अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा या गावातील खरपी शेत शिवारात घडली…४५ वर्षीय सुनंदा लखन ठाकरे असे मृतक महिलेचे नाव आहे..तर अचलपूर जीवनपुरा येथे राहणारा ४२ वर्षीय आरोपी -सुनील रामाजी मसराम असे संशयित आरोपी इसमाचे नाव आहे.. सुनील हा सेवा निवृत्त अधिकारी पाटेकर यांच्या खरपी येथील शेताची चौकीदारी करीत होता… सुनील याच्या सोबत काही दिवसापासून मध्य प्रदेश राज्यात राहणारी मृतक सुनंदा लखन ठाकरे सुद्धा झोपडीत एकत्र राहत होती..सकाळ च्या दरम्यान अचानक सुनंदा झोपडीत रक्त बंबाळ अवस्थेत आढळून आली.. याची माहिती मिळताच अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार सोबतच शिरसगाव कसबा पोलीस निरीक्षक महेंद्र गवई यांनी आपल्या ताफ्यासह खरपी शेत शिवार गाठले.. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.. सुनंदाच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार केल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवीला.. या हत्या घटनेत पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली सुनील मसराम याला विचारणा केली असता त्याच्यावर पोलिसांचा संशय निर्माण झाला.. सुनील सोबत सुनंदा ठाकरे या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने रागाच्या भरात तिच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून तिची हत्या करण्यात आल्याची दाट संशय आल्याने या घटनेत अखेर शिरसगाव पोलिसांनी सुनील मसराम याला ताब्यात घेतले .. मृतक महिला सुनंदा हिचा दोन वेळा विवाह सुद्धा झाला होता.. मात्र ती पतीपासून वेगळी राहत होती.काही वर्षा पासून ती सुनील सोबत लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होती अशी माहिती समोर येत आहे,, आता या हत्येचा पुढील तपास शिरजगाव कसबा पोलीस निरीक्षक महेंद्र गवई यांच्या नेतृत्वात पोलीस करीत आहे