ताण, तणाव मुक्तीकरीता क्रीडा स्पर्धा संजिवनीचे काम करतात- साैरभ कटीयार

गेल्या वर्षी लोकसभा व विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या. त्यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांनी कमालीची एकजूट दाखवली यामुळेच निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या. अशीच एकजूट आपण कायम राखावी, शासकीय, जनतेची कामे आणि दैनंदिनी कामकाज करत असताना ताण तणाव घालवण्यासाठी क्रीडा स्पर्धा संजीवनीचे काम करतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी साैरभ कटीयार यांनी केले.जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा जवारहरलाल नेहरू विभागीय क्रीडा संकूल येथे १० ते १२ जानेवारीदरम्यान पार पडल्या. यावेळी अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी साैरभ कटीयार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी साैरभ कटियार होते. स्पर्धेचे उद्घाटन अमरावती शहराचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा, महानगर पालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस अधीक्षक विशाल आनंद, सहाय्यक जिल्हाधिकारी मिन्नू पी. एम., अप्पर जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधकारी, अमर राऊत, विवेक जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिलकुमार भटकर, क्रीडा व युवा सेवाचे उपसंचालक शेखर पाटील, उपजिल्हाधिकारी निवडणूक शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी पुनर्वनसन प्रजेनजित चव्हाण उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात जीवनामध्ये खेळाचे महत्व अधोरेखित केले. नियमित खेळामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. सर्वांनी दैनंदिन कामासोबत विविध खेळ खेळण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दैनंदिनी कामकाज करत असताना ताण तणाव घालवण्यासाठी विविध खेळ खेळून आरोग्य सूदृढ ठेवण्याकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन केले. महानगरपालिका आयुक्त अमरावती सचिन कलंत्रे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्र, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन केले. प्रास्तविक व आभार प्रदर्शन मोर्शी उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांनी केले. संचालन कृष्णा पखाले यांनी केले. याप्रसंगी सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार] सर्व नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, ग्राममहसूल अधिकारी, महसूल सेवक, शिपाई यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. महसूल खेळाडूंनी परिधान केलेले ट्रॅकसूट सर्वांचे लक्ष वेधत होते. क्रीडा स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी संघटनांचे पदाधिकारी व खेळाडूंचे बॅनर्सही ठिकठिकाणी निदर्शनास येत होते. खेळाडूंसाठी चहा, नास्ता, भाेजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माेर्शी उपविभागासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी
कर्मचारी कसोसिने काम करीत आहेत.