Latest NewsNagpur
नागपूर गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने वाहन चोरटा घेतला ताब्यात

नागपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनेत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस पथकांनी एका वाहन चोरीचे प्रकरण उघडकीस आणून वाहन चोरट्याला ताब्यात घेऊन लाखोंचा मुद्द्यामाल जप्त केला आहे. दोघांच्या संगनमताने वाहन चोरी करण्यात आली होती. या प्रकरणात आता पोलीस दुसऱ्या पसार चोरट्याच्या शोधात लागले चोरट्या कडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. आता पोलीस पथक त्याच आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराच्या शोधात लागले आहे.
नागपूर शहरात अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटना घडल्याने आता गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच च्या पोलीस पथकांनी चोरी सोबतच वाहन चोरीच्या प्रकरणाचा छडा लावून चोरट्याला ताब्यात घेतले. जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मेकोसो बाग येथून कीर्ती नगर हुडकेश्वर नागपूर येथे राहणारा 29 वर्षीय आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडीया याला ताब्यात घेतले त्याच्या जवळील बोरीची पाहणी केली असता त्यामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग करिता लागणाऱ्या साहित्य तांब्याचे तार व इतर मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी त्याची कौसुन चौकशी केली असता चोरट्याने त्याच्या साथीदाराने लकडगंज हद्दीत व यवतमाळ जिल्ह्यातील वणी हद्दीत चोरीसह वाहन चोरी केल्याची माहिती समोर आली. आरोपीचा साथीदार महाल नागपूर येथे राहणारा लकी शाहू याच्या शोधात आता पोलीस लागले आहेत. चोरी केलेला मुद्देमाल नागपूर येथील ताजबाग येथे राहणारा समीर शेख कबाडी याला विकले होते. या प्रकरणात पोलिसांनी एक लाख 73 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल सह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन दोन मोबाईल असं ऐकून एक लाख 73 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
नागपूर शहरातील जर्जीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका आरोपीला शाखा युनिट क्रमांक पाचच्या पोलीस पथकांनी संशयितरित्या ताब्यात घेतले. यादरम्यान मात्र तोच संशयित अट्टल वाहन चोरीचा आरोपी निघाला. वाहन चोरट्याने आपल्या साथीदारासह लाखो रुपये किमतीचे वाहन चोरी केले होते. दोघांनी इतर ठिकाणी सुद्धा काही मुद्द्यमालाची चोरी केली होती अशी माहिती सुद्धा आता उघडकीस आली आहे.