Latest NewsNagpur
नॉयलॉन मांजा चा वापर करू नका नागपुरात विद्यार्थ्यांनी पोस्टर द्वारे राबविले अभियान
१४ जानेवारी मकर संक्रात सणाला नागपूर शहरात पतंग उडविण्याची मोठी फॅशन असते मात्र याच पतंगबाजीत अनेक पतंग शौकीन नॉयलॉन मांजा चा वापर करीत असल्याने अनेकांच्या जीवावर बेतत असते तर पक्षी सुद्धा मोठ्या जखमी होत असतात या दरम्यान नागपूर शहरात नॉयलॉन मांजाचा वापर करू नये या जनजागृती करिता अनेक शिक्षण संस्था एकवटल्या संविधान चौकात पोस्टर वर चित्र काढून नॉयलॉन मांजा विरुद्ध अभियान राबविण्यात आले.
नागरिकांनो येणाऱ्या १४ जानेवारीला आपण सर्व नागरिक मकर संक्रात उत्सवात पतंगबाजी चा तर आनंद भरपूर घ्या मात्र याच उत्सवात नॉयलॉन मांजा चा कृपया वापर करू नका. नॉयलॉन मांजा मुळे या आधी अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे सोबतच आता सुद्धा अनेक नागरिक आणि पक्षांना सुद्धा गंभीर इजा होत आहे. अशी जनजागृती अभियान नागपूर शहरातील अनेक शिक्षण संस्थेतील विद्दयार्थ्यांनी राबविले. ११ जानेवारीला नागपूर शहरातील संविधान चौकात वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण समाजउपयोगी अभियान राबविले, पोस्टर वर विविध चित्र रेखाटून नॉयलॉन मांजा विरुद्ध समाज हिताचा संदेश देण्यात आला. यावेळी डॉ. मनोहर कुंभारे डॉ संदीप मेश्राम प्रा. शांतनु मोटघरे प्रा. सलोनी पांडे यांच्या नेतृत्वात पोस्टर अभियान राबविण्यात आले. नागपूरकरांनी नॉयलॉन मांजा चा वापर करू नये असे आवाहन विद्यार्थ्यांनी केला. पर्यावरण कि सुरक्षा देश कि सुरक्षा अशा घोषणा देण्यात आल्या.
मकर संक्रात सणाला पतंग उडविण्याची प्रथा असल्याने हल्ली याच सणात जीवघेणा नॉयलॉन मांजा चा वापर होत असल्याने अनेकांचा अपघात झाला आता सुद्धा अनेक निष्पाप नागरिक मांजाने गंभीर जखमी होत असल्याच्या घटना घडत आहे या दरम्यान नागपूर शहरातील वसंतराव नाईक शासकीय कला संस्था व समाजविज्ञान संस्था च्या विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण जनजागृती राबविल्याने नक्कीच नागपूरकर नॉयलॉन मांजाला तिलांजली देणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.