पत्नीचा विश्वासघात महागात; दोन विवाहांमुळे 12 जणांवर गुन्हा दाखल

“एकीकडे समाजात नात्यांना टिकवण्याची आणि जपण्याची परंपरा आहे, तर दुसरीकडे विश्वासघाताच्या अशा काही घटना समोर येतात ज्या नात्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. अर्धापूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीच्या दुसऱ्या विवाहाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“मनोहर सुरेश तरटे आणि वैशाली भीमराव भोसले यांचा विवाह 2019 साली झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. पण संसार सुरळीत सुरू असतानाच वैशालीने आपल्या तीन वर्षीय मुलाला घेऊन मनोहरचे घर सोडले आणि पलायन केले. मनोहरने पत्नी आणि मुलाचा सर्वत्र शोध घेतला, पण ते कुठेही आढळले नाहीत. दरम्यान, वैशालीने छत्रपती संभाजीनगरच्या हट्टी येथील अंकुश सांडू शिंदेसोबत दुसरा विवाह केला. मनोहरने अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार केली, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर मनोहरने अर्धापूर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रकरणाचा अभ्यास करून पत्नी वैशाली आणि तिच्या 11 नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अर्धापूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदवला आहे.”
“हे प्रकरण समाजाला विचार करण्यास भाग पाडणारे आहे. कायद्याचा आधार घेतलेला मनोहरचा हा लढा फक्त त्याच्यासाठी नाही, तर अशा प्रकारच्या घटनांमध्ये न्याय मिळवण्यासाठी प्रेरणा देणारा ठरू शकतो. पाहायला हवे, या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो.
आजसाठी इथेच थांबूया..