11 जानेवारी 2025 आज की Top 10 News
1) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर येथे पत्रकारांशी संवाद राज्याच्या विकसकामांकडे आमचे लक्ष आहे, मविआ चा विचार करायला आम्हाला वेळ नाही, शिवसेनेला उत्तर द्यायला मी बांधील नाही, ते रिकामटेकडे आहेत – मुख्यमंत्री
2) मोर्शी येथील 2 महिला सावकारांच्या घरांवर छापा
दीड तास चाललेल्या या कारवाईत, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे करण्यात आली जप्त
3) शिक्षण मंत्री यांची आगळी वेगळी कामाची पद्धत, शाळांमध्ये भेटी देत असतांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लावला व्हिडीओ कॉल, उपमुख्यमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी साधला संवाद, एकनाथ शिंदे यांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांना दिल्या सूचना, शाळेच्या विकसकामांचा घेतला आढावा.
4)वडिलांनी मोबाइल न दिल्याने 17 वर्षीय ओमकार पैलवार ने घेतला.गळफास, मुलाची आत्महत्या पाहून वडीलाही केली आत्महत्या,
घटनेमुळे पैलवार कुटुंबीय आणि मिनकी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.
5) पत्नीने दुसऱ्या पुरुषाशी केला विवाह , पहिल्या पतीने दाखल केली तक्रार, पोलिसांमध्ये तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. म्हणून मनोहर तरटे यांची न्यायालयात धाव, अखेर, अर्धापूर न्यायालयाने वैशाली आणि तिच्या 11 नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
6) अमरावती येथील एक धक्कादायक अपघात घडला, राजपेट ते राजकमल मार्गावर नायलॉन माँजत अडकून दुचकीसवार गाडीवरून खाली पडला. या अपघातात दुचाकी सवाराची थोडक्यात वाचला मात्र नायलॉन माँजामूळे निर्माण केलेला धोका खूपच मोठा आहे. प्रशासनाच्या कठोर करवाहि नंतरही सर्रास विकल्या जातो बाजारात मांजा.
7)नगपूच्या पारडी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींचा पोलीसांनी पर्दाफाश केला, घरफोडीतील आरोपींला मुद्देमालसह केले अटक, आरोपी मोहम्मद फैय्याज आणि लक्की ताब्यात, गुन्हेशाखा युनिट ५ ची कारवाई, चोरट्यांकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण १,६४,९००/- रू. चा मुद्देमाल जप्त
8) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID कडून कारवाईला जोर आला असून सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर कारवाईत तत्परता आल्याचे दिसून येते.
9)69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी नर्मदात परिक्रमेची सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश देत क्षेत्रीय निवृत्त अधिकारी दिनकर बिरारे यांना पत्नीचा विरोध होता, मात्र ते निर्णयावर ठाम होते, बच्चे कंपनींकडून आजोबांचं जल्लोषात स्वाग करण्यात आलं
10) शिवपुतळा दुर्घटनाप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला जामीन, कोर्टाने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला करण्यात आली होती अटक