जिल्हा परिषद बांधकाम विभाग अमरावती मधील निविदा घोटाळा करणारा आका अजूनही मोकाटच.

प्रशासकीय राज लागल्यापासून जिल्हा परिषद बांधकाम विभाग अमरावती चे कार्यकारी अभियंता यांनी निविदा सूचना काढण्याचा जो झपाटा लावला होता त्या निविदा बाहेरच्यांना भरू नये म्हणून काही जाचक अटी टाकून (ज्या अटीला शासनाचा काहीच आधार नाही) मर्जीतील काही निवडक कंत्राटदारांना कामे देत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अमरावती व युवक काँग्रेस च्या वतीने मार्च 2024 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या कडे वारंवार केली होती. प्रशासकीय राज लागल्यापासून या निविदा कमिटी मधे असलेल्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक नुकसान केली असल्याची सुद्धा तक्रार केली होती. गेल्या 8, 9 महिन्यापासून केलेल्या तक्रारीचा पाठवपुरवा संघटनेने केल्याने घोटाळा करणारा आकां आणि त्याचा आका दोघांना पण कळले होते की आता आपण फसलो, कारवाई आपल्यावर होणारच म्हणून एका साध्या कर्मचाऱ्याचा बळी घेतला असल्याची चर्चा जिल्हा परिषद बांधकाम विभाग अमरावती मधे आहे. निविदा सूचना वर ज्यांची sign असते, टेंडर ओपन करतांना , तांत्रिक मान्यता देताना, ज्यांची dsc लागते असे कार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे महत्त्वाचे आरोपी असायला हवे पण त्यांनी एक सामान्य निविदा लिपिक याला बळीचा बकरा बनवून स्वतः अजूनही मोकाटच फिरत आहे, संघटनेने प्रत्येक तक्रारीचे कागदोपत्री पुरावे सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना हेच दाखवून दिले की हे सर्व घोटाळे निविदा समितीनेच केलेले आहे तरीपण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी आकावर डोळे झाक करून फक्त नाममात्र चौकशी करीत असल्याचे दाखवत आहे आणि ज्या माणसाची एकट्याची चूक नाही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाची कारवाई तर कार्यकारी अभियंता, तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर करणे अपेक्षित होते असे सर्वांचे मत व्यक्त होत आहे परंतु जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नाममात्र चौकशी करीत असल्याचे दाखवून का निलंबन करत नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे. केलेल्या तक्रारीचे पुरावे असून सुद्धा कारवाई होत नसेल तर मग मात्र दाद कोणाला मागावी… जिल्हा परिषद मध्ये टेंडर मॅनेज करणारी मोठ्या ठेकेदारांची टोळी सक्रिय आहे जे लोक सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या कामावर गदा आणतात अशा लोकांचे मुखवटे फाटावेत अशी सगळ्यांना अपेक्षा आहे…