AmravatiLatest News
बापरे बिस्कीट पुड्यातून पडल्या अळ्या, डी मार्ट मधील प्रकार
डी मार्ट मधून बिस्कीट खरेदी करून घरी आणले असता त्यात चक्क अळ्या च बाहेर पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रकार बियाणी चौकातील डी मार्ट मध्ये घडल्याचा आरोप नागरिकांने केला आहे. यावर अन्न औषधी प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अमरावतीत एक धक्कादायक बातमी समोर आला. शहरातील बियाणी चौकात असलेल्या डी मार्ट मधून बिस्कीट खरेदी केल्या नंतर बिस्किट पुड्यातून चक्क आढळल्या असा आरोप नारायण कराडे यांनी केला आहे. कराडे यांच्या घरी हा प्रकार घडला नारायण यांनी दुपारी डी मार्ट मधून बिस्कीट खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. घरी आल्यानंतर बिस्किट उघडताच त्यातून अळ्या बाहेर पडल्याचे स्पष्ट केले. आता ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी आता नारायण कराडे यांनी केली आहे. या गंभीर प्रकरणावर अन्न व औषधी प्रशासन या गंभीर विषयाची दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
नामांकित असलेल्या डी मार्ट मध्ये चक्क बिस्कीट खरेदी केल्या नंतर त्यातून अळ्या निघणे हा खळबळजनक प्रकार आहे. आता यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडे कारवाई ची मागणी केली जात आहे.