युवा स्वाभिमान पक्षाच्या वर्धापन दिनी पत्रकार बांधवांचा सन्मान, स्पर्धेचे बक्षीस वितरण
12 जानेवारी युवा स्वाभिमान पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त युवा स्वाभिमान पार्टीचे शहराध्यक्ष सुरज मिश्रा यांच्या वतीने ओसवाल भवन येथे अनेक समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार 12 जानेवारी रोजी स्वाभिमान महोत्सवाचे आयोजन स्वराज्य न्युज पेपर संपादक संघ व स्वर्गीय ब्रीजनाथ मिश्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानेआयोजित करण्यात आले . राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती व मराठी वृत्तपत्राचे जनक बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला .कार्यक्रमाला देवराज तिवारी संजय मापले अजय खडे कैलास जोशी शशांक दुबे सह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले यासोबतच मान्यवरांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला ,,, आयोजित कार्यक्रमात जेष्ठ पत्रकारांचा सुद्धा पुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मोफत विविध शिबिराचे आयोजन करण्यात आले यात आरोग्य तपासणी दंत तपासणी डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप आरटीओ लर्निंग लायसन्स कॅम्प चे आयोजन करण्यात आले शिबिराचा शेकडो नी लाभ घेतला ओसवाल भवन येथे रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते अनेक बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.