Latest NewsNagpur
एमआयडीसी पोलीस हद्दीत गारनेट मोटर इंडिया येथे २५ लाखांची चोरी!

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 ते 11 जानेवारी दरम्यान गारनेट मोटर इंडिया येथे चोरी झाल्याची घटना घडली. 25 लाखांपेक्षा अधिक रक्कम चोरीला गेली आहे. या चोरीचे तपास सुरू आहेत.
गारनेट मोटर इंडिया मध्ये कामगारांचे पगार देण्यासाठी राखून ठेवलेली 25 लाख 15 हजार 283 रुपयांची रक्कम अज्ञात चोरांनी चोरून नेली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर चार अज्ञात चोरटे चोरी करताना दिसले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली, मात्र चोरांना सिसिटीव्ही कॅमेरे त्यांना कैद करत आहे यांपासून अनभिज्ञ या चोरांनी चोहरा मात्र स्कार्फ मे लपवलेला होता. एमआयडीसी पोलिसांनी या अज्ञात आरोपीनविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे."