कामगारांचा आवाज बुलंद, शक्ती महाराज ठिय्या आंदोलनात आक्रमक

“एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीत घडलेल्या विषबाधा प्रकरणाने कामगारांचे हाल पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. कालीमाता मंदिर विश्वस्त शक्तीपीठ पिठाधीश्वर शक्ती महाराज यांनी थेट कंपनीत धडक देत, व्यवस्थापनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे हक्क आणि सुरक्षिततेचा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. या घटनेची सविस्तर माहिती पाहूया.” “गोल्डन फायबर कंपनीतील कामगारांचे प्रश्न आणि महिला कामगारांवरील अन्यायाची गंभीर दखल शक्ती महाराजांनी घेतली आहे. आता व्यवस्थापन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी आम्हाला बघत राहा.” “रविवारी विषबाधा झाल्यानंतर सोमवारी शक्ती महाराज थेट एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीत पोहोचले. त्यांनी कामगारांकडून माहिती घेत, कंपनी व्यवस्थापनावर ताशेरे ओढले. व्यवस्थापनाकडून महिलांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे, आणि याविरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यावेळी महिला कामगारांसाठी रात्रीची ड्युटी रद्द करण्याची मागणीही करण्यात आली. कंपनीच्या प्रवेशद्वारावर शक्ती महाराजांनी कामगारांसोबत ठिय्या आंदोलन केले, तर कंपनीच्या बैठकीत व्यवस्थापनावर कडाडून टीका केली. न्याय न मिळाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.”