छत्रपती संभाजी नगरच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी प्रकरण 24 तासांत उघड; आरोपींना पकडले

छत्रपती संभाजी नगर राहणारे 53 वर्षीय फिर्यादी 11जानेवारी ला प्लॉट जमीन विक्री व्यवहारातून नगदी 1 करोड 20 लाख सोबतच मुलाच्या लग्नासाठी मित्राकडून 30 लाख रक्कम अशी एकूण रक्कम 1 कोटी 50 लाख रक्कम घेऊन ग्रँड महफिल हॉटेल थांबले. 12 जानेवारी ला ग्रँड महफिल येथून वाहनातं रोख रक्कम ठेवून संभाजी नगर जाण्याच्या तयारीत असताना चालकाला वाहना जवळ थांबविले. फिर्यादी नास्ता करायला गेले असता आरोपी ने गाडीतील रक्कम घेऊन पसार झाला. वाहणाच्या चाबी महफिल हॉटेल सुरक्षा रक्षक जवळ देऊन पोबारा केला होता. सिटी कोतवाली पोलिसांनी कलम 307 अंतर्गत गुन्हा केला होता दाखल. पोलीस आयुक्त नवीनचन्द्र रेड्डी यांनी तात्काळ गंभीर दखल घेऊन 4पोलीस पथक तयार करून आरोपी च्या शोधात केले रवाना. पोलीस पथकने सीसीटीव्ही फुटेज तपास करून रवाना झाले. गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस पथक सह सिटी कोतवाली डिबी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट चारचाकी वाहणाचा नंबर शोधून आरोपीचा शोध लावला. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा अंढेरातांडा राहणारा 26 वर्षीय आरोपी प्रवीण उर्फ पंडित शेषराव केदार दिग्रस चौक बुलढाणा राहणारा 32 वर्षीय आरोपी विकास बारकू वाघ भांनखेड चिखली बुलढाणा राहणारा 27 वर्षीय आरोपी नितीन सजन इंगळे या तिघे आरोपी ना सीताफिने ताब्यात घेतले. चोरी गेलेल्या मुद्देमाल मधून 1 कोटी 45 लाख 71 हजार 500 रुपये नगदी जप्त करण्यात आले सोबतच चोरीत वापरलेली एम एच 43 ए एल 3161 क्रमांकाची स्वीप्ट डिझायर वाहन जप्त केले. अमरावती शहरात सर्वात मोठी चोरी गेलेल्या रक्कम घटनेचा पोलीस पथकाने केवळ 24तासात शोध घेतल्याने पोलीस आयुक्त रेड्डी यांनी 1लाख रुपयाचा गुन्हे शाखा व सिटी कोतवाली पोलिसांना रिवार्ड जाहीर केला. या प्रकरणात पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केल.