नाणे फेकून ठरवलं की खून करायचा की नाही…, 18 वर्षाच्या मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

पोलंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलंडमध्ये उघडकीस आलेल्या या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला. पोलंडच्या माणसाने मुलीला मारण्यासाठी नाणे फेकले आणि नंतर तिची हत्या करून तिच्या मृत शरीरावर बलात्कार केला. आरोपीने जो काही खुलासा केला तो तर आणखीनच धक्कादायक होता.
वाटेत झाली मुलीशी भेट
पोलंडच्या स्थानिक वेबसाइट एस्काच्या रिपोर्टनुसार, 18 वर्षीय तरुणीचे नाव व्हिक्टोरिया कोझिलस्का आहे. व्हिक्टोरिया एके दिवशी पोलंडच्या कॅटोविस शहरातील एका पार्टीतून घरी परतत असताना कार दुरुस्तीच्या दुकानात नुकतीच शिफ्ट संपवलेल्या माटेउज हेपा भेटला. माटेउज हेपाने तिला आपल्या अपार्टमेंटमध्ये नेले, जिथे ती झोपली. नंतर, त्याने क्रूरपणे तिला मारहाण केली आणि दोरीने तिचा गळा आवळून खून केला. एवढंच नाही तर त्यानंतर तिचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळला आणि पोलिसांशी संपर्क साधला, असे त्याच्या चाचणीत उघड झाले आहे.
नाणे फेकून केला मारण्याचा प्लॅन
डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 20 वर्षीय किलरने सांगितले की, “मी एक नाणे फेकले, तर हेड आले. हेड आले म्हणून मी तिला मारले. जर नाण्यावर टेल आली असती तर कदाचित ती जिवंत राहिली असती. व्हिक्टोरिया कोझिलस्काचा मृतदेह सापडल्यानंतर काही तासांतच त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याने पोलिसांना सांगितले की, “मला मारण्याची गरज वाटली.”
मी तिच्या छातीवर बसलो आणि तिचा गळा दाबला
आरोपीन न्यायालयात सांगितले की, ऑगस्ट 2023 च्या हत्येपूर्वी तो एखाद्याला मारण्याचा विचार करत होता आणि पीडितेच्या शोधात शहरात फिरण्यात वेळ घालवला होता. ” त्या दरम्यान मला कोझिलस्का ही मुलगी भेटली, मी तिला घरी जाण्याचा किंवा माझ्यासोबत येण्याचा पर्याय दिला. तिने माझ्यासोबत यायचे ठरवले. आम्ही बसलो, काहीही बोललो नाही, मग ती झोपी गेली. ” मी खोलीत फिरलो, तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला उठवू शकलो नाही. मग मी एक नाणे फेकले, ज्यावर हेड आले, म्हणून मी तिला मारले. मी असे का केले ते मला माहित नाही. काही गोष्टी घडतात. माझे त्यांच्यावर नियंत्रण नाही. कधीकधी मी कठीण निर्णय घेण्यासाठी नाणे वापरतो. मी तिच्या छातीवर बसलो आणि तिचा गळा दाबू लागलो. मी गळा दाबणे निवडले कारण रक्त येत नव्हते. तिने श्वास घेण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी होती तिच्यात माझाशी लढण्याची ताकद नव्हती, तिने आपला जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मरण पावली.”
हत्येनंतर केला बलात्कार
तिला मारल्यावर मी तिचे कपडे काढले आणि नंतर तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. मग मी कपडे घातले आणि तिचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. मला नीट विचार करता येत नव्हता. मी तिचा मृतदेह एका पिशवीत टाकला, ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि जाळण्याचा प्लॅन केला. मला तिला मारल्यावर बरे वाटेल असे वाटले.