राजाराम प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

राजाराम प्रतिष्ठानच्या २०२५ सालाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमाला राजाराम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. किरणताई महल्ले आणि उपाध्यक्ष ऋषिकेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रतिष्ठानचे शुभम घोम आणि हिमांशु गोस्वामी हे प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “संयम, स्थितप्रज्ञता आणि सहनशीलतेने कठीण प्रसंगावर मात करता येते. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेतला पाहिजे.”
राजाराम प्रतिष्ठानने या दिनदर्शिकेचे वितरण नवसारी प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे काम हाती घेतले आहे. उपाध्यक्ष ऋषिकेश देशमुख यांनी सांगितले की, या दिनदर्शिकेद्वारे प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठीवर कौतुकाची थाप देत कार्यकर्त्यांना आगामी काळात समर्पित कामासाठी प्रोत्साहन दिले. या भेटीमुळे नव्या उर्जेचा अनुभव मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि दिनदर्शिकेच्या प्रकाशनामुळे राजाराम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे. यशाच्या दिशेने प्रेरणा देणारा हा सोहळा भविष्यातील कामगिरीसाठी दिशादर्शक ठरेल.