Latest NewsVidarbh Samachar
जन संघर्ष अर्बन निधीच्या प्रणित मोरेला लोणावळा येथून अटक

जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेड च्या यवतमाळ व वाशिम अशा सहा शाखेत मोठा अपहार झाल्याचे उघड झाले. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसात तक्रार होण्यापूर्वीच जन संघर्ष चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणित मोरे हे फरार झाले. तब्बल 44 कोटींच्या रुपयांच्यावर अपहार करून फरार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्याचे आवाहन पोलिसांपुढे होते. अखेर प्रणित मोरेला लोणावळा येथून पोलिसांनी अटक केली आहे. प्रणित सह इतर 3 संचालकांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. या चारही संचालकांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ठेवीदारांना आपल्या ठेवी परत मिळतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.