Amaravti GraminCrime News
मुंबई पोलिसांची दर्यापुरात धडक कारवाई, ऑनलाईन फ्रॉड प्रकरणी १२ जण ताब्यात
मुंबई पोलिसांनी दर्यापूर शहरातील सदानंद कॉलनीत छापा मारला आणि ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात १२ जणांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल आणि दुचाकी वाहनं जप्त केली.”
“मुंबई पोलिसांना मुंबईत घडलेल्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणातील आरोपींच्या शोधात असताना, दर्यापूर येथील लोकेशन मिळाल्यानंतर तात्काळ एक पथक दर्यापुरात दाखल झाले. बंडू पवार यांच्या भाड्याच्या खोलीत धाडसत्र घालून १२ युवकांना ताब्यात घेतले.”
“मुंबई पोलिसांनी दर्यापूर पोलिसांच्या मदतीने १२ जणांना ताब्यात घेतल्यानंतर, आता ते चौकशीसाठी मुंबई रवाना होणार आहेत. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.”