AmravatiLatest NewsLocal News
समाज विकासाकरिता स्वयंसेवी संस्थांची भूमिका महत्वाची – अमित धंदर

स्वयंसेवी संस्था स्थानिक समुदायांसोबत जुळून काम करण्यासाठी, त्यांच्या गरजा आणि आव्हाने समजून घेण्यासाठी विशिष्ट स्थितीत कार्य करीत असतात. समाजातील विविध घटकांचे प्रश्न, समस्या आणि अडचणी यावर उपाय म्हणून स्वयंसेवी संस्था ह्या समाज विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत दिव्य सदन सोशल सेंटर, अमरावती येथील प्रकल्प समन्वयक अमित धंदर यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील एम.ए. आजीवन अध्ययन व विस्तार या अभ्यासक्रमाच्या वतीने विद्यार्थांसाठी दिव्य सदन सोशल सेंटर अमरावती येथे संस्था भेटी प्रसंगी ते विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
प्रकल्प समन्वयक अमित धंदर पुढे म्हणाले, विद्यार्थी हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कौटुंबिक समस्येबरोबर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी बयाच स्वयंसेवी संस्था आज कार्य करीत आहे. त्यापैकी अमरावती येथील दिव्य सदन सोशल सेंटर ही पारधी समुदाय विधवा आणि परित्यक्त्या महिला, शेतकरी गट, किशोरवयीन मुली या महत्वाच्या घटकांसाठी कार्य करणारी नामांकित संस्था म्हणून ओळखली जाते. अशा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाया स्वयंसेवी संस्थांमध्ये विद्याथ्र्यांनी आपली भूमिका बजावणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले. यावेळी समन्वयक डॉ. प्रशांत भगत यांनीही मार्गदर्शन केले. या संस्था भेटीचे आयोजन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी विद्याथ्र्यांसह डॉ. अंबादास घुले, डॉ. रोहित येवतीकर, प्रा. वैभव जिसकार, प्रा. राहुल मिश्रा, प्रा. अमोल घुलक्षे आदी उपस्थित होते.