Accident NewsLatest News
“समृद्धी महामार्गावर भीषण अपघात – चालक ठार, १५ प्रवासी जखमी”
एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर धामणगाव रेल्वे जवळ झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताने महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धामणगाव रेल्वे जवळील समृद्धी महामार्गावर आज पहाटे पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि एका फोर व्हीलरमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्सच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत."
“जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.” “अपघाताची कारणे स्पष्ट होत नसली तरी अंदाज आहे की, वाहनांचा वेग आणि चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी. महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या बनली आहे.”
“समृद्धी महामार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. या अपघाताने अनेकांच्या जीवनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही प्रार्थना करतो की जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे आणि प्रशासनाने महामार्गावरील सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात.सुरक्षित रहा, सावध रहा.