“स्वच्छ सर्वेक्षण 2024” अमरावती महापालिका सफाई कर्मचारी यांचे क्षमता बांधणी घटका अंतर्गत प्रशिक्षण

केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे. या भारत अभियानाचा मूलभूत घटक असणारे सफाई कर्मचारी यांचे शहर स्वच्छतेमध्ये मोलाचे योगदान आहे. अभियानातील सफाई कर्मचारी यांचे योगदान तसेच जबाबदारी लक्षात घेवून महापालिका अतिरिक्त आयुक्त मा. श्रीमती शिल्पा नाईक यांच्या अध्यक्षतेत दि. 15-01-2025 रोजी श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे सकाळी 11.00 वाजता स्वच्छता,प्लास्टिक बंदी, ICT Based Technology याबाबत अमरावती महापालिका सफाई कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने १००% कचरा संकलन करणे,ओला-सुका कचरा वर्गीकरण करणे, घातक वस्तु/पदार्थ इत्यादी वेगळे संकलीत करणे,प्लॅस्टिक बंदी मोहीम, व्यावसायिक ठिकाणी दररोज दिवसातून दोन वेळा रात्रीच्या वेळेसह साफसफाई, नियमित नाले साफसफाई तसेच ICT Based Technology चा वापर करून QR कोड स्कॅन करणे याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त मा. श्रीमती शिल्पा नाईक यांनी प्रस्तावनेत सर्व सफाई कामगारांचे प्रबोधन केले. सदर प्रशिक्षणाकरीता ITI कंपनी मुंबई चे प्रतिनिधी श्री. आवेश खान, श्री. आकाश श्रीवास्तव ICT Based Technology या विषयावर प्रबोधन करण्याकरीता उपस्थित होते. तसेच महापालिका अमरावती मार्फत स्वास्थ अधिक्षक, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके, सर्व जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, सर्व स्वास्थ निरीक्षक,बिटप्यून तसेच मनपा व कंत्राटदार यांचे सफाई कर्मचारी उपस्थित होते.