अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांनी घेतला मालमत्ता कर विभागाचा कार्याचा आढावा

मालमत्ता कर विभागाच्या कार्यासंबंधी गुरुवारी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीत उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, सहाय्यक आयुक्त दिप्ती गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुभाष जानोरे, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी, कर निरीक्षक, कर वसुली लिपिक उपस्थित होते.
या बैठकीत चालू आर्थिक वर्षा करीता मालमत्ता कर अपेक्षित आय उद्दिष्ट गाठणे हेतू निश्चित केलेले झोन निहाय दैनंदिन उद्दिष्ट प्रत्येक झोन द्वारा गाठणे अपेक्षित आहे त्या करीता झोन सहाय्यक आयुक्तांनी जास्तीत जास्त मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकाकडे थकीत रक्कम वसूल करून घेणे संबंधी तसेच मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकाकडे सहाय्यक आयुक्त च्या नेतृत्वात मालमत्ता कर वसुली पथक द्वारा वसुलीची उचित कार्यवाही करून घेणेचे निर्देश अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांनी सर्व झोन सहाय्यक आयुक्तांना दिले. तसेच थकबाकीदाराकरीता काढलेल्या मालमत्ता कर वसुली वारंट अंतर्गत कार्यवाही पूर्ण करुन थकीत मालमत्ता कर वसुल करणेचे निर्देश सर्व झोन सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले. १९४० थकबाकीदारांना महानगरपालिकेतर्फे जप्तीची नोटीस पाठविण्यात आले आहे.
मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांना मोठ्या थकीत धारकांना जप्तीची नोटीस पाठवण्याचे निर्देश मनपा अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांनी आढावा बैठकीत दिले. वसुली लिपिकाने प्रभागात नियोजन करत मालमत्ता कर वसूल करावा. प्रत्येक वसुली लिपिकाने प्रभागात मालमत्ता कर मोहीम राबवावी. वसुलीचे संपूर्ण लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले. मोठ्या मालमत्ता कर थकीत प्रकरणे शोधून काढण्याबाबत सूचना करण्यात आल्या. थकीत मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली होणे गरजेचे आहे. झोन निहाय पथक तयार करत मालमत्ता कर वसुलीला वेग द्यावा.
आता थकीत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला.
वसुली लिपिक यांनी जास्तीत जास्त थकबाकीदारांकडे पाठपुरावा करावा, नेमून दिलेल्या भागात फिरावे, थकबाकीदाराना फोन करावा त्यांना जाऊन भेटावं. व्हॉट्सअप ग्रुप करावित, एस.एम.एस. पाठवावे, वारंवार विनंती करुन कर भरत नाहीत. जे कर भरत नाहीये त्यांची मालमत्ता जप्ती करावी आणि थकबाकी पोटी जी मालमत्ता अगोदरच जप्त केलेली आहे अशी मालमत्ता चे लिलावची प्रक्रिया सुरू करावी. त्यांनी मालमत्ता सर्वेक्षण साठी नेमलेले कर्मचाऱ्यांना पण कामात सुधारणा करण्याची सूचना केली. त्यांनी जास्तीत जास्त मालमत्तांचे सर्वेक्षण दैनंदिन करावे आणि ते कर वसुली विभागाच्या निदर्शनास आणून द्यावे. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी सूचना केली की ज्या कर्मचाऱ्यांचे वसुलीचे आकडे निरंतर कमी आहे त्यांनी ही शेवटची संधी समजून वसुली वाढावी. जे वसुली लिपिक मालमत्ता कर वसुल करणार नाही त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असा सज्जड इशारा मालमत्ता कर विभागाला दिला.
यावेळी मालमत्ता धारकांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरुन सहकार्य करावे व जप्ती टाळावी असे आवाहन महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांनी केले आहे.