अमरावतीत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांची रंगतदार सुरुवात
“अमरावती जिल्ह्यात दिव्यांग मुला-मुलींसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात काल सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. अमरावती जिल्हा परिषद आणि अशासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींसाठी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांची शानदार सुरुवात झाली आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे या स्पर्धा 15 ते 17 जानेवारी 2025 दरम्यान होत आहेत.
पहिल्या दिवशी एकविरा मंगल कार्यालयात दिव्यांग दृष्टिबाधित, कर्णबधिर, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाटिका आणि एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर आमले यांनी केले, तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
“दिव्यांग विद्यार्थ्यांची क्षमता, क्रीडाक्षेत्रातही किती प्रभावी ठरू शकते, याचा प्रत्यय या स्पर्धांच्या निमित्ताने येतोय. या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी पाहणे निश्चितच प्रेरणादायी ठरेल. पुढील अपडेटसाठी पाहत रहा.