अमरावती शहरात चार दिवसात 3 हजार 172 अर्ज निघाली, पोलीस आयुक्तांनी ऑन द स्पॉट केलं तक्रारीचे निवारण

अमरावती शहर पोलीस मुख्यालय हद्दीत दहा पोलीस स्टेशन येतात, यामध्ये वर्षभरात 3हजार719 पोलीस तक्रार पडून होत्या, छोटे घरगुती भांडण, घरा शेजारचे भांडण, सोसायटीमधील तंटे, छेडखाणी, शेतीचे वाद यासह विविध तक्रारी प्रलंबित असल्याने अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी अमरावतीमध्ये तक्रार निवारण केंद्र उभारत चार दिवसात तब्बल 3 हजार 172 अर्ज निकाली काढले, पोलिसांनी अर्जदार व गैरअर्जदार या दोघांना एकत्र बसून दोघांमध्ये समवेत घालून आणला व तक्रारीचा निपटारा केला,अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी चार दिवस तक्रार निवारण सुरू केल्याने यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये पडून राहणाऱ्या तक्रारी ऑन द स्पॉट तक्रारींचं निवारण करण्यात आलं, त्यामुळे वर्षानुवर्ष पडून राहणाऱ्या तक्रारीला अखेर न्याय मिळाल्याने अर्जदार व गैरअर्जदार या दोघांना न्याय मिळाल्याची भावना बोलून दाखवली