Amaravti GraminLatest News
परतवाडा-अमरावती मार्गावरील अवैध ट्रॅव्हल्सवर कारवाई; 60 हजारांहून अधिक दंड वसूल

"परतवाडा-अमरावती मार्गावरील अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन विभागाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. या कारवाईत 60 हजारांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. पाहूया सविस्तर वृत्त."
"परतवाडा-अमरावती मार्गावर अवैध ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीच्या तक्रारी वाढत असल्याने प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कठोर पावले उचलली आहेत. आज सकाळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक नाबाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष कारवाई करण्यात आली. विना परमिट चालणाऱ्या गाड्यांवर 60 हजारांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात अवैध वाहतूक थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. मागील आठवड्यात देखील या विभागाने तब्बल 1 लाख 67 हजार रुपयांचा दंड वसूल करून वाहतुकीवर नियंत्रण आणले होते."
"परिवहन विभागाची ही कारवाई अवैध वाहतुकीसाठी एक गंभीर इशारा आहे. परतवाडा-अमरावती मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि नियमबद्ध वाहतुकीसाठी ही कारवाई महत्त्वाची ठरत आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज