राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस – मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 14 वडाळी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11/01/2025 रोजी राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस निमित्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त मा. शिल्पा नाईक, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍडव्होकेट श्रीमती भावना ठाकरे उपमुख्य अधिवक्ता, न्याय रक्षक कार्यालय अमरावती, डॉ विशाल काळे मनपा आरोग्य विभाग,निकिता चौहान याप्रसंगी ऍडव्होकेट भावना ठाकरे, अनुराधा खंडारे, विधीस्वयंसेवक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती तसेच अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा लव्हाळे उपस्थित होते.
याप्रसंगी ऍडव्होकेट भावना ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना, मानवी तस्करी, पोक्सो कायदा, विद्यार्थ्यांनी घ्यावयाची दक्षता दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने कायदेशीर सेवा, विविध संरक्षण योजना याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मनपातील अतिरिक्त आयुक्त माननीय शिल्पा नाईक मॅडम HMPV आजाराविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा केली व त्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन निकिता चौहान प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका चेतना बोंडे,आभार प्रदर्शन अनुप भारंबे यांनी केले.