LIVE STREAM

AmravatiLocal News

विद्यापीठात कॅम्पसची जैवविविधता (वनस्पती व प्राणी) कॅटलॉग वर 28 जानेवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन आणि विद्यापीठातील वनस्पती व प्राणी समिती यांचे संयुक्त विद्यमाने ‘कॅम्पसची जैवविविधता (वनस्पती व प्राणी) कॅटलॉग’ या विषयावर दि. 28 जानेवारी, 2025 रोजी दृकश्राव्य सभागृह याठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व सल्लागार समितीचे सदस्य डॉ.ए.बी. मराठे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 450 एकर परिसरामध्ये नैसर्गिक वनस्पती व प्राण्यांचा समृद्ध आणि वैविद्धपूर्ण वावर आहे. कॅम्पसमध्ये वनस्पती, प्राणी, जिवाणू, बुरशी आणि इतर जीव सृष्टीसह विविध सजीवांची जैवविविधता असून उंच झाडांपासून ते सूक्ष्म झाडे व वनस्पती सुद्धा आहेत. कॅम्पसमधील जैवविविधतेचे संवर्धन करणे, देखभाल आणि योग्य मूल्यमापन करणे, आदींच्या अनुषंगाने ही कार्यशाळा लक्ष केंद्रीत करीत आहे. वनस्पती ओळख, प्राणी ओळख, जी.पी.एस. टॅग केलेली छायाचित्रणे या क्षेत्रातील फिल्डवर्कवर कार्यशाळेत लक्ष केंद्रीत होणार आहे.
सकाळी 11 वाजता नोंदणी, दु. 12 ते 12.30 उद्घाटन कार्यक्रम, त्यानंतर ‘इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ फ्लोरा अॅन्ड फौना अन्ड देअर सिग्निफिकन्स टू इकोसिस्टीम डायनामिक्स’ यावर वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार, ‘कलेक्शन, आयडेन्टिफिकेशन अॅन्ड प्रिपरेशन ऑफ प्लांट हर्बेरियम’ यावर डॉ. प्रशांत गावंडे, ‘मशरुम कलेक्शन अॅन्ड आयडेन्टिफिकेशन’ यावर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, वरुडचे प्राचार्य डॉ. दिलीप हांडे, ‘अंडरस्टॅÏन्डग अॅन्ड प्रोटेÏक्टग द अॅनिमल लाईफ ऑन युनिव्हर्सिटी कॅम्पस’ यावर जैवविविधता तज्ज्ञ डॉ. जयंत वडतकर व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे डॉ. गजानन वाघ, ‘असेसमेंट ऑफ मेडिसिनल व्हॅल्यू इन प्लांट्स कन्क्ल्युडिंग रिमार्कस्’ यावर डॉ. अनिता पाटील माहिती देतील.
विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहामध्ये आयोजित कार्यशाळेकरीता नोंदणी शुल्क रू. 100/- ठेवण्यात आलेले आहे. वनस्पती व प्राणी समितीच्या निर्देशिका सल्लागार मंडळामध्ये जीवतंत्रशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगावकर, माजी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.जे.ए. तिडके व डॉ.एस.आर. माणिक यांचा समावेश असून जीवतंत्रशास्त्र विभागातील वरीष्ठ प्राध्यापक डॉ. अनिता पाटील, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार व प्रशांत गावंडे हे या परिषदेचे आयोजक आहेत. याकरीता समिती गठीत करण्यात आली आहे. अधिक माहितीकरीता डॉ. अनिता पाटील यांचेशी दूरध्वनी क्र. 9881735354 यावर संपर्क साधता येईल. कार्यशाळेकरीता ज्यांना सहभागी व्हावयाचे असेल त्यांना https://forms.gle/pA8BPaZJLdtGznJfA या लिंकवरुन नोंदणी करता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!