AmravatiLatest News
आशीर्वाद बार चोरी; 12 तासांत आरोपी पोलिसांच्या गळाला

"आशीर्वाद बारमध्ये झालेल्या चोरीने शहरात खळबळ उडवली होती. मात्र, गाडगे नगर पोलिसांच्या जलद कार्यवाहीमुळे अवघ्या १२ तासांत आरोपीला गजाआड करण्यात आले आहे.
"१६ जानेवारीला रात्री सिंधी चौकातील आशीर्वाद बारमध्ये धाडसी चोरी घडली. अज्ञात चोरट्याने बारमधील ६७,८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात ७,००० रुपयांची नगदी, १०,००० रुपयांचे बिलिंग मशीन, २४,००० रुपयांचे साहित्य आणि ९,६०० रुपयांच्या विदेशी दारूचा समावेश होता.
गाडगे नगर डीबी पोलिसांनी बारच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. अकोटच्या हिवरखेड रोडवरून आरोपी गजानन अरुण आत्राम (४१ वर्षे) याला अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून ३४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये LG मॉनिटर, जिओ वायफाय राऊटर, Epson बिलिंग मशीन यांचा समावेश आहे. सदर कार्यवाही पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार व उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार मानकर व त्यांच्या पथकाने केली."
आरोपीला पकडल्याने गाडगे नगर पोलिसांनी अत्यंत प्रभावीपणे तपास करून चोरीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या जलद कार्यक्षमतेची प्रशंसा होत आहे.