International NewsLatest News
कोलकाता महिला डॉक्टरवर बलात्कार, हत्याप्रकरणात संजय रॉय दोषी; कोर्टाचा मोठा निर्णय!

कोलकात्यातील आर.जी.मेडीकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. यावर आता न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवण्यात आले आहे. भारतीय न्याय संहीता कलम 64 (बलात्कारासाठी शिक्षा), 66 (मृत्यूचे कारण बनल्यासाठी शिक्षा) आणि 103 (हत्येसाठी शिक्षा) नुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे.
‘तुला शिक्षा मिळायलाच हवी’
मला फसवणाऱ्या इतर लोकांना का सोडलं जातंय? असा प्रश्न यावेळी संजयने न्यायाधिशांना विचारला. याला उत्तर देताना न्यायाधिश अनिर्बान दास म्हणाले, मी सर्व पुरावे बारकाईने पाहिले आहेत. सर्वांची साक्ष ऐकली आहे. या सर्वानंतर तुला दोषी ठरवलं आहे. तू दोषी आहेस. तुला शिक्षा मिळायलाच हवी, असे न्यायाधिशांनी म्हटले. न्यायालय 20 जानेवारी रोजी संजय रॉयच्या शिक्षेची घोषणा करणार आहे. तोपर्यंत त्याला न्यायालयिन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण पसरले होते.