Latest NewsNagpur
गोंडवाना चौकातील बिट्स युनीसेक्स सलूनमध्ये चालत होता देह व्यवसाय; पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका”

"गोंडवाना चौक येथील बिट्स युनीसेक्स सलून आणि मसाज पार्लरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महिलांना पैशांचे आमिष दाखवून इथे अवैध देह व्यवसाय चालवल्या जात असल्याचा खुलासा पोलिसांच्या कारवाईत झाला आहे.
गोंडवाना चौकातील बिट्स युनीसेक्स सलून आणि मसाज पार्लर हा केवळ सलून आणि स्पा सेवा देत नाही, तर महिलांना पैशांचे आमिष दाखवून अवैध देह व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, त्या महिलांना या व्यवसायात अडकवण्यात आले होते. चौकशीतून समोर आले की, हा अवैध व्यवसाय बऱ्याच महिन्यांपासून इथे सुरू होता. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे आणि सलूनच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे."
"या प्रकरणावरून पुन्हा एकदा समाजातील अशा अवैध धंद्यांचे वास्तव समोर आले आहे. पोलिसांची ही तत्परता आणि कारवाई कौतुकास्पद आहे.