जादूटोण्याच्या संशयावरून मेळघाटात 77 वर्षीय वृद्ध महिलेची नग्न धिंड, सखोल चौकशी सुरू
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून 77 वर्षीय वृद्ध महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेने राज्यभर खळबळ उडवली असून, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. सविस्तर माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली .
चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा गावात 30 डिसेंबर रोजी घडलेल्या या अघोरी घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. 77 वर्षीय वृद्ध महिला रात्री शौचासाठी घराबाहेर गेली असता, आरोपींनी तिला घराबाहेर पकडले. त्यानंतर पहाटेपासून तिच्यावर जादूटोण्याचा आरोप करत मारहाण सुरू झाली.
गावातील पोलीस पाटील बाबु झाकु जामुनकर, सयबु चतुर आणि इतर आरोपींनी तीला नग्न करून गावात फिरवलं. इतकंच नाही, तर तिच्या शरीरावर गरम लाकडाचे चटके देऊन तिला गावाबाहेर हाकलून दिलं. या घटनेमुळे पीडितेला अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागले.7 जानेवारीला पीडितेची सून आणि मुलगा चिखलदरा पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी या अमानवीय प्रकाराची तक्रार दिली. मात्र, घटनेनंतर अनेक दिवस उलटूनही पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. अखेर 17 जानेवारीला पीडितेने थेट पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली.
पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने घेत तपासाची जबाबदारी विशेष पथकाला दिली आहे. आरोपींवर कठोर कारवाईची हमी देत, दोषींना शिक्षा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
“जादूटोण्यासारख्या अंधश्रद्धेच्या नावाखाली एका वृद्ध महिलेला झालेल्या या अमानुष अत्याचाराने समाजातील अंधश्रद्धेचा अंधकार पुन्हा समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींना कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा आहे