LIVE STREAM

AmravatiLatest NewsLocal News

तुरीच्या घसरलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, आंदोलनाचा इशारा

  "शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा होत असतानाच तुरीच्या घसरलेल्या भावामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये तुरीला 12 हजार रुपये भाव मिळत होता, मात्र अवघ्या वीस दिवसांत हा भाव 7 हजार रुपयांवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.     
   "भावाचा मोठा फरक:डिसेंबर महिन्यात तुरीला 12 हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता, पण काही दिवसांतच 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी तुरीसाठी कमीत कमी 10 हजार रुपये भाव देण्याची मागणी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु अद्याप कर्जमाफी न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. तुरीचा हमीभाव सरकारने निश्चित करावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी बाजार समितीच्या सभापतींनी केली आहे. तुरीला योग्य भाव मिळत नाही आणि कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. शेतकरी म्हणतात की, अशा परिस्थितीत शेती टिकवणे कठीण झाले आहे."

“शेतकऱ्यांच्या समस्या अधिक गंभीर बनत चालल्या आहेत. तुरीच्या घसरलेल्या भावांवर त्वरित निर्णय घेतला गेला नाही, तर शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी आणि हमीभावाची अंमलबजावणी केली, तरच या समस्येवर तोडगा निघेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!