LIVE STREAM

Crime NewsLatest News

पोटच्या पोरीचा अश्लील व्हिडिओ बनवला, सैतान आई-बापाने नात्याला काळीमा फासला

  चेन्नई :तामिळनाडू येथून एका दाम्पत्याला त्यांच्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी आई-वडील आपल्या मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करायचे. बालकल्याण समितीने (CWC) याबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने या जोडप्याचा शोध घेतला. आणि त्या जोडप्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी एका आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यात अल्पवयीन मुलींच्या अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप होत्या.
  पोलिसांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या आरोपीकडील मोबाईलमधील बहुतांश व्हिडिओ मुलीच्या संमतीशिवाय छुप्या कॅमेऱ्याने शूट केले गेले आहेत. अशा स्थितीत अधिक तपासात समोर आले की, व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीने आपल्या मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात उतरण्यास भाग पाडले होते. आणि इतर मुलींसोबत तिचा व्हिडिओ बनवला होता.
 पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

पोलिसांच्या पथकाने या जोडप्याला अटक केली. आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. अल्पवयीन मुलीला सरकारी देखभाल केंद्रात ठेवण्यात आले आहे. जिथे तिला, तिच्या मनावर झालेल्या या आघातातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन आणि इतर आवश्यक आधार देण्यात आला. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याचे मोबाईल फोन आणि इतर सामान जप्त करण्यात आले असून. ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.
अलीकडेच, काही दिवसांपूर्वी मुंबईतून असाच एक प्रकार समोर आला होता. ज्यात एका महिलेला तिच्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याप्रकरणी न्यायालयाने नऊ वर्षांची शिक्षा सुनावली होती. अनैतिक तस्करी प्रतिबंध कायद्यांतर्गत तिच्या मुलीला वेश्याव्यवसायात भाग पाडल्याच्या आणि तिच्या कमाईतून जीवन जगण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले.
आई-वडील आपल्या मुलांचा आधार असतात. मुलं सजाण होईपर्यंत त्यांच्या सर्वांगिण विकासाची आणि सुरक्षेची संपुर्ण जबाबदारी पालकांची असते. मुलांसाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणे, त्यांच्या उज्वल भवितव्याकरिता त्यांना योग्य मार्ग निवडण्यासाठी मदत करणे, या पालकांच्या जबाबदाऱ्या असतात. पण मुलांंना गैरमार्गात ढकलून त्यांच्या जीवावर कमाई खाणाऱ्या पालकांना कठोरात कठोर शिक्षा होणं काळाची गरज बनली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!