लेखा व कोषागारे विभागाच्या कला व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
लेखा व कोषागारे संचालनालयाव्दारे दोन दिवसीय विभागीय कला व क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन वाशिम येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्ह्यांतील अधिकारी-कर्मचारी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या विभागस्तरीय स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्याने विशेष कामगिरीची नोंद करत कला व क्रीडा स्पर्धा 2025 चे सर्वसाधारण विजेते पद पटकावले असून सर्वसाधारण उपविजेता वाशिम संघ ठरला.
सांस्कृतिक स्पर्धेमध्ये एकेरी महिला गायन या प्रकारात अमरावतीच्या वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार यांनी प्रथम स्थान मिळवले. दुहेरी माहिला गायन स्पर्धेमध्ये श्रीमती तृप्ती तिप्पट व श्रीमती भारती वालचाळे यांनी प्रथम स्थान मिळवले. सामुहिक नृत्य प्रकारात अमरावती संघाने व्दितीय स्थान प्राप्त केले.
वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. विभागीय स्तरावर वैयक्तिक, दुहेरी तथा सामुहिक स्पर्धा यावेळी घेण्यात आल्यात. त्यात धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, चालणे, पोहणे, कॅरम, बुध्दिबळ, टेबलटेनिस, बॅडमिंटन, हॉलीबॉल, क्रिकेट, थ्रोबॉल, खो-खो व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये अमरावती जिल्हा क्रिकेट या प्रकारात विजेता ठरला तर खो-खो महिला संघाने प्रथम स्थान पटकावले तसेच थ्रोबॉलमध्ये महिला संघ व्दितीय ठरला.
धावणे 100 मीटर या प्रकारात महिला गटातून अमरावतीच्या आरती जनबंधू यांनी व्दितीय स्थान पटकाविले. धावणे 200 मीटर या प्रकारात महिला गटातून प्रिया कापसे यांनी प्रथम तर पुरुष गटातून श्रीकार माटे यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. तसेच 100 बाय 4 रिले प्रकारातून पुरुष गटातून अमरावती संघ उपविजेता ठरता यामध्ये भूषण जोशी, रुपेश जयपुरे, मयूर देशमुख व श्रीकार माटे यांनी सहभाग नोंदविला. या प्रकारात अमरावती महिला संघाने सुध्दा व्दितीय क्रमांक पटकावला असून यामध्ये भारती जनबंधू, कोमल गोसावी, प्रतिभा पवार व जागृती चौधरी यांनी सहभाग नोंदविला. नयना सोलव यांनी थाळी फेक महिला प्रकारात प्रथम तर लांब उडी महिला प्रकारात व्दितीय क्रमांक पटकावला. चालणे तीन किमी प्रकारातून सारिका कोरान्ने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पोहणे 50 मीटर व 100 मीटर या दोन्ही प्रकारात लेखाधिकारी जयदेव देशपांडे यांनी प्रथम स्थान पटकाविले.
कॅरम या खेळ प्रकारात पुरुष गटातून चंदन गजभिये व महिला गटातून प्रिया करडे यांनी व्दितीय स्थान पटकावले. कॅरम दुहेरी महिला यामध्ये प्रिया करडे व राजश्री भोकरे यांचा संघ उप विजयी झाला. बुध्दीबळ मिश्र या प्रकारात राजश्री भोकरे यांनी प्रथम स्थान मिळविले. टेबल टेनिस एकेरी पुरुष यामध्ये अमरावतीचे सहा. संचालक अमोल ईखे यांनी व्दितीय स्थान पटकावले तर टेबल टेनिस पुरुष दुहेरी यामधून अमोल ईखे व विकी रोडे यांचा संघ उप विजयी ठरले. टेबल टेनिस दुहेरी महिला यामधनु प्रिया करडे व राजश्री भोकरे यांनी व्दितीय स्थान मिळविले. बॅडमिंटन एकेरी पुरुष या गटातुन भुषण जोशी उप विजेते ठरले असून बॅडमिंटन एकेरी महिला या गटातून नयना सोलव हया उप विजेत्या ठरल्या. बॅडमिंटन दुहेरी महिला यामध्ये नयना सोलव व प्रिया करडे यांनी व्दितीय स्थान मिळविले.
रांगोळी स्पर्धेत स्त्री सक्षमीकरण या विषयावर रांगोळी काढून अमरावतीच्या यामिनी खरड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. अमरावती विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये सहसंचालक (लेखा व कोषागारे) श्रीमती प्रिया तेलकुंटे , सहसंचालक (स्थानिक निधी) श्री. गायकवाड साहेब, वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार तसेच वित्त विभागातील अधिकारी तथा कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.