शौचास गेलेल्या सहा वर्षीय बालकाला ट्रकची जोरदार धडक; पायाला गंभीर इजा

आजची हृदयद्रावक घटना आहे अमरावती जिल्ह्यातील मोगरा बेडा येथील, जिथे शौच्यासाठी गेलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलाला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघाताने परिसरात खळबळ उडवली असून बाळाच्या पायाला गंभीर इजा झाली आहे.
“शनिवारी दुपारी ३ वाजता अमरावती जिल्ह्यातील मोगरा बेडा गावात एक भयंकर अपघात घडला. सहा वर्षांचा महिंद पवार शौचास बाहेर गेला होता, तेव्हा अमरावती ते मालखेड रस्त्यावरून जात असलेल्या दोन ट्रकपैकी एका ट्रकने त्याला जोरदार धडक दिली.
या अपघातात महिंदच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. ट्रकची धडक इतकी तीव्र होती की या चिमुकल्याला तात्काळ रुग्णालयात हलवावे लागले. सध्या महिंदला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.अपघातग्रस्त चिमुकल्याचे आई-वडील डोळ्याने दिव्यांग असून या घटनेने संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. नातेवाईक महिलेने दिलेल्या माहितीनुसार, धडकेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे.”
“अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्यासाठी संपूर्ण गावाला मोठी चिंता लागून राहिली आहे. अपघाताच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. ट्रक चालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.