“गोव्यात पॅराग्लायडिंग दुर्घटना: पुण्याच्या शिवानी दाबलेचा मृत्यू, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप”

गोवा हे देशभरातील पर्यटकांचे आवडते टूरीस्ट डेस्टिनेशन आहे. समुद्र किनाऱ्यांची सैर करताना पर्यटक येथे साहसी खेळांचा थरारक अनुभव देखील घेतात. हाच थरारक अनुभव एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. गोव्यामध्ये पॅराग्लायडिंग करताना महिला पर्यटकासह धक्कादायक प्रकार घडला. हवेत उडणाऱ्या पॅराशूटचा दोर तुटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पुण्यातील तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
या विचित्र दुर्घटनेत पुण्यातील 27 वर्षीय शिवानी दाबले आणि 26 वर्षीय नेपाळी पायलट सुमन नेपाळी या दोघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर गोवा पोलिसांनी पॅराग्लायडिंग कंपनीचा मालक शेखर रायजादा याला अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे.