फेक इंस्टाग्राम आयडी बनवून फोटो व्हायरल प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

खोलापूर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय युवतीचे फेक इंस्टाग्राम आयडी तयार करून तिचे फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तांत्रिक गुन्ह्यांशी संबंधित असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या 21 वर्षीय युवतीने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार आरोपी दीपक जय श्रीराम हाडोळे याने युवतीचे फेक इंस्टाग्राम आयडी तयार करून फोटो व्हायरल केले. आरोपी आणि फिर्यादी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हापासूनच आरोपीने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, आरोपीविरुद्ध यापूर्वीही 354 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी खोलापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार राहुल जाधव आणि पोलीस निरीक्षक सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपीवर कलम 78(2)बि, एन.एस. 66(c) आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून, अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. नागरिकांनी अशा घटनांबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे