दर्यापूरच्या वडूरा पूर्णा येथे परमहंस श्री बंडूजी महाराजांच्या यात्रेत लाखोंचा जनसागर!

“दर्यापूर तालुक्यातील वडूरा पूर्णा गावात गेल्या 30 वर्षांपासून परमहंस श्री बंडूजी महाराज यांच्या समाधी मंदिरात आयोजित होणाऱ्या भव्य यात्रा महोत्सवाने यंदाही भाविकांच्या मनात स्थान मिळवले आहे. या उत्सवाला उपस्थित लाखो भक्तांनी दर्शन घेऊन व महाप्रसादाचा आस्वाद घेत भक्तिमय वातावरण निर्माण केले. चला, पाहू या या उत्साहपूर्ण यात्रेचा संपूर्ण आढावा.”
वडूरा पूर्णा गावातील परमहंस श्री बंडूजी महाराज यांच्या समाधी मंदिरात आयोजित यात्रा महोत्सव यावर्षीही लाखो भाविकांसाठी भक्तिरसाचा सोहळा ठरला. मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या यात्रेत महाप्रसादाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सतपाल भाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने केले.
यात्रा परिसरात महिलांसाठी व मुलांसाठी विविध आकर्षक वस्तूंच्या दुकानांनी बाजारपेठ सजली होती. स्थानिक व जिल्ह्यातील ग्रामीण-शहरी भागातून आलेल्या लोकांनी यात्रेचा आनंद लुटला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे यात्रा शांततेत पार पडली.
“परमहंस श्री बंडूजी महाराज यांच्या समाधी मंदिरातील यात्रा भाविकांच्या भक्तिभावाने भारावून गेली. एकात्मता व श्रद्धेचे प्रतीक ठरलेल्या या यात्रेने यंदा आणखी एक विक्रमी महोत्सव पार पाडला.