दर्यापूर: अवैध धंद्यांचे केंद्र बनत चाललेले क्षेत्र

दर्यापूर हे अमरावती जिल्ह्यातील एक छोटं शहर आता अवैध धंद्यांसाठी चर्चेत आहे. रेत तस्करी, वरली मटका आणि अवैध दारू विक्रीमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय.
“दर्यापूर तहसीलमधून रात्रभर रेत तस्करी करणाऱ्या ट्रकांची बिनधास्त ये-जा सुरू आहे. महसूल प्रशासन व पोलीस विभाग यांच्या दुर्लक्षामुळे हे धंदे भरभराटीला आले आहेत, अशी चर्चा आहे.
याशिवाय, वरली मटका आणि अवैध दारू विक्रीचे अड्डे गावागावात फोफावत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, या धंद्यांना काही अधिकारी व बड्या राजकीय नेत्यांचे आशीर्वाद आहे, ज्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
यामुळे या भागातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. स्थानिक लोक प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या विषयावर कारवाई होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.”
“दर्यापूरमधील अवैध धंद्यांविरोधात प्रशासन कठोर पावले उचलेल का? की अजूनही नागरिकांना त्यांचा आवाज उठवत राहावा लागेल?
यासाठी प्रशासन आणि राजकीय नेत्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे लवकरच कळेल.