Latest Newsmelghat
न्यूज हेडलाइनरेयट्याखेडा येथे वृद्ध महिलेला जादूटोणाच्या संशयातून मारहाण; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची पिडीत महिलेच्या घरी भेट
"रेयट्याखेडा येथे जादूटोणाच्या संशयातून वृद्ध महिलेला अमानुष मारहाण झाल्याची घटना उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज पिडीत महिलेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली आणि गावकऱ्यांना शांतता व सौहार्द कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे."
"चिखलदरा तालुक्यातील रेयट्याखेडा गावात ३० डिसेंबर रोजी जादूटोणाच्या संशयातून एका वृद्ध महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज गावाला भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, तहसीलदार जीवन मोरानकर, आणि पोलिस उपअधीक्षक सिद्धेश्वर धुमाळ हे उपस्थित होते.
घटनेबाबत पिडीत महिलेकडून संपूर्ण माहिती घेतली असून या प्रकरणात पोलिस पाटलासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.गावांमध्ये सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रशासनातर्फे २१ जानेवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये नागरिकांना अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल."
"रेयट्याखेडा येथील हा प्रकार समाजातील अंधश्रद्धेचे गंभीर चित्र समोर आणतो. जिल्हा प्रशासनाने यावर कठोर पावले उचलली असून अशा घटनांना पुन्हा वाव मिळू नये, यासाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.