पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप येथे टेकलॉन्स-२०२५ चे उदघाटन

“मोटिव्हेशन शिवाय इनोव्हेशन शक्य नाही” आणि यशस्वी होण्यासाठी प्रेरणा ही सर्वांत महत्त्वाची असते. प्रत्येक नवीन कल्पना किंवा शोधामागे प्रेरणादायी कथा दडलेली असते. ज्या व्यक्तींना समाज बदलायचा आहे किंवा स्वतःचा ठसा उमटवायचा आहे, त्यांना स्वतःसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व व कथा शोधणे अत्यावश्यक आहे.
“नवीन काहीतरी निर्माण करण्यासाठी आतून येणारी जिद्द आणि प्रेरणा महत्त्वाची आहे. ही प्रेरणा विद्यार्थी जीवनापासूनच तयार केली पाहिजे,” असे आनंद कुमार म्हणाले. उदघाटन कार्यक्रमादरम्यान त्यांनी सुपर 30 च्या विद्यार्थ्यांच्या यशकथाही विद्यार्थ्यांना सांगितल्या ,ज्या प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांनी हे देखील आवर्जून सांगितले की, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भारताला आघाडीवर नेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने नवीन कल्पनांचा पाठपुरावा करावा व देशाचे नाव मोठे करावे पुढे ते म्हणाले मेहनत केल्याने परिस्थिती बदलते हे वाक्य फक्त शब्दांत मर्यादित नाही, तर अनेकांनी ते आपल्या आयुष्यात सत्य करून दाखवले आहे. विद्यार्थ्यांनी अपयश आल्यास खचून जाऊन आत्महत्या करू नये याउलट ज्या विषयात आपण कमजोर असतो त्यावरच लक्ष केंद्रित करून अभ्यास करा यश तुमच्या मागे धावत येईल यात शंका नाही. तसेच मेहनत आणि चांगले वर्तनच यशाचे खरे रहस्य आहे. पी. आर. पोटे पाटील ग्रुप च्या विद्यार्थ्यांना प्रत्येक कार्यात व क्षेत्रात संस्थेकडून मोटिव्हेशन मिळाल्यानेच आज हि संस्था उच्च पदावर असल्याचे प्रतिपादन सुपर ३० प्रोग्रॅम चे संस्थापक व गणिततज्ञ आदरणीय आनंद कुमार यांनी आज पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप अमरावती येथील स्वामी विवेकानंद ऑडिटोरिअम येथे १०००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.
पी. आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप येथील विद्यार्थ्यांच्या विविध क्लब द्वारा आयोजित केलेल्या टेकलॉन्स २०२५ या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे उदघाटन सुपर ३० प्रोग्रॅम चे संस्थापक व गणिततज्ञ आदरणीय आनंद कुमार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. टेकलॉन्स २०२५ कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर सर्व आयोजित हॅकॅथॉन, कोडेथॉन, एक्सेलरेट, स्टार्टअप कॉम्पिटिशन प्रोजेक्ट, मॉडेल एक्झिबिशन, कॅड वॉर, टॅलेंट बॅटल, लॅन गेमिंग, सर्किट मॅनिया, बिझनेस प्लॅन, पेपर आणि पोस्टर प्रेझेंटेशन, ऍग्रीकल्चर एक्झिबिशन, स्ट्रक्ट फेस्ट, डिझाईन कॉम्पिटिशन, डिबेट फेसऑफ आणि इतर ऑन-स्पॉट इव्हेंट्स चे उदघाटन सुद्धा करण्यात आले. यावर्षी हॅकॅथॉन, कोडेथॉन या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारी स्पर्धा असल्याने या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्याचप्रमाणे यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुपर ३० प्रोग्रॅमचे संस्थापक व गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या संकल्पना अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांनी गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण दिले असून, त्यांच्या प्रयत्नांतून आजपर्यंत ५१० विद्यार्थी आयएएस, आयपीएस, आयआरएस बनले आहेत किंवा देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. “तुमच्यात नैसर्गिक गुण नसेल तरीही तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात मनापासून मेहनत करत असाल, तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.” असे प्रतिपादन पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपचे अध्यक्ष प्रविण पोटे पाटील यांनी केले.
यावेळी मंचावर पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप या संस्थेचे अध्यक्ष आ. श्री प्रवीण पोटे पाटील , संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील, संस्थेतील संचालक डॉ. पी. एम. खोडके ,पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. जावंधिया, पी. आर. पोटे पाटील आयुर्वेद महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. एस.एल. भुतडा, पी. आर. पोटे पाटील फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ डी. बी. रुईकर, पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. अनिल ठाकरे, पी. आर. पोटे पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्रचार्य प्र. सुज़ान गवई, पी. आर. पोटे पाटील बीएड महाविद्यलय प्राचार्य डॉ, ए. बी. देशमुख, पी. आर. पोटे पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डब्लू देशमुख, पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचे उपप्राचार्य डॉ. मो. झुहेर, स्टुडंट वेल्फेअर डीन डॉ एस. के नंदा, , टेकलॉन्स कोऑर्डिनेटर डॉ पल्लवी मानकर, डॉ विशाल पडोळे , प्रमुख , स्टुडंट्स ऑर्गनायझर कमिटी, स्टुडंट्स टेकलॉन्स कोऑर्डीनेटर उपस्थित होते.