प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहिम: १२,५००/- रुपये दंड व ३ किलो प्लास्टिक जप्त
मा.आयुक्त, मा.अतिरिक्त आयुक्त मॅडम व वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव यांचे निर्देशानुसार आज दि.२०/०१/२०२५ रोजी उत्तर झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या शेगाव नाक ते पंचवटी परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन बाबत मोहिम राबविण्यात आली असून एकुण २८ आस्थापनाधारक, किरकोळ विक्रेता यांचे आस्थापनाची तपासणी करण्यात आली असून तपासणी दरम्यान आस्थापनामध्ये कापडी अथवा कागदी बॅग किंवा ७५ मायक्रोन पेक्षा जास्त जाडीचे प्लॅस्टिक वापर करतांना आढळून आल्याने सदर किरकोळ विक्रेत्यांकडुन प्लास्टिक जप्ती करण्यात आली. तसेच ३ आस्थापनामध्ये डस्टबिन न आढळून आल्याने आस्थापना निखील चांदेकर यांना १०००/- रुपये, चांदेकर बेकरी यांना १०००/- रुपये, मोहरे फुल भंडार यांना ५००/- रुपये दंड व प्लास्टिक पिशव्या आढळुन आल्याने आस्थापना कॉंर्नर वडापाव यांना ५०००/- रुपये, अंकुश पान सेन्टर यांना ५०००/- रुपये दंड असे एकूण १२,५००/- रूपये इतका दंड वसूल करण्यात आला व ३ kg प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
सदर मोहीममध्ये जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजु ढिक्याव, अमरावती शहर समन्वयक डॉ.श्वेता बोके, प्लॅस्टिक पथक प्रमुख नोडल अधिकारी विकी जेधे, विनोद टांक, ए.एम सैय्यद, इमरान खान, अकिब शेख, प्रविण उसरे, बिटप्युन ढेणवाल, श्री तुंडलायत व सफाई कर्मचारी उपस्थित होते.