Amaravti GraminLatest News
भव्य शंकरपटाची रंगत – वलगाव मध्ये महाराष्ट्रभरातून बैलगाड्या जमल्या!

"वलगाव – महाराष्ट्रातील बैलगाडी स्पर्धेची परंपरा जपणाऱ्या वलगाव येथे सुरू आहे भव्य शंकरपट! तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेमध्ये पाच लाख रुपयांचे भव्य बक्षीस ठेवण्यात आले आहे.
वलगाव येथे सुरू असलेल्या शंकरपट स्पर्धेने बैलगाड्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. डॉक्टर निंबाळकर यांनी सिटी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी सहा सेकंद 92 पॉईंटच्या कामगिरीसह मन्या आणि लाइटर या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमुळे या स्पर्धेला एक आगळावेगळा उत्साह दिसून येत आहे.
माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेला भव्य स्वरूप देण्यात आले आहे. अंतिम दिवशी पाच लाख रुपयांचे बक्षीस वितरण होणार असून, या स्पर्धेचा मोठा क्षण ठरणार आहे.
“वलगावमध्ये सुरू असलेला हा शंकरपट महाराष्ट्रातील बैलगाडी स्पर्धांचा शिरोमणी ठरत आहे. उद्याच्या अंतिम दिवशी कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.