मेळघाट हाट येथील खादी महोत्सव 25 जानेवारीपर्यंत

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बस स्टॉड समोरील सायन्सकोर मैदान येथील मेळघाट हाट येथे खादी महोत्सवाला सुरवात झाली असून 25 जानेवारी 2025 पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. अमरावतीकरांनी मोठ्या संख्याने खादी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्ह्यात विकेंद्रीत सोलर चरखा समुह कार्यक्रम राबविण्यात येत असून उद्योग विभागाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक समुह विकास कार्यक्रमातंर्गत सोलर चरखा समुहासाठी सामुहिक सुविधा केंद्र अमरावती एम. आय. डी. सी. क्षेत्रात प्रस्थापित करण्यात आले आहे.
या प्रकल्पातंर्गत खादी व सोलर चरख्यापासून अनेक दर्जेदार उत्पादने तयार केले जात असून यामध्ये ग्रामीण भागातील 300 पेक्षा जास्त महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. यामध्ये धारणी तालुक्यातील शंभर महिलांचा समावेश आहे.
या प्रकल्पातंर्गत उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. 20 ते 25 जानेवारी 2025 पर्यंत खादी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये विविध दर्जेदार खादी उत्पादने सवलतीच्या दरात अमरावतीकरांना उपलब्ध होणार आहेत. तसेच मेळघाटातील महिला बचत गटांनी तयार केलेली विविध दर्जेदार उत्पादने मेळघाट हाट येथे विक्रीस उपलब्ध आहेत.