Crime NewsLatest NewsVidarbh Samachar
घाटंजीत घरकुलाच्या रकमेवर डल्ला; शेतकरी महिलेला मिरची पूड टाकून लुटले

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे दिवसाढवळ्या एका शेतकरी महिलेच्या अंगावर मिरची पूड टाकून तिच्या घरकुलाच्या रकमेवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
घाटंजी येथील दुर्गा पांडुरंग टेकाम या शेतकरी महिलेच्या खात्यावर नुकतीच घरकुल योजनेची २०,००० रुपयांची रक्कम जमा झाली होती. दुर्गा टेकाम यांनी ही रक्कम महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून काढली आणि पायी घराकडे निघाल्या. यावेळी, मागावर असलेल्या दोन दुचाकीस्वारांनी तिच्यावर मिरची पूड टाकली आणि हातातील पिशवी हिसकावून घेतली.
या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
“शेतकऱ्यांसाठी घरकुल योजना म्हणजे आधार, पण अशा घटना शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतात. प्रशासनाने त्वरित पावले उचलून आरोपींना गजाआड करावे,