मनपात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

गुरुवार दिनांक २३ जानेवारी,२०२५ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांचे हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करतांना त्यांचे जीवनचरित्र (अल्प परिचय) दर्शविणारा फलक लावण्याच्या सुचना शासनांनी निर्गमित केले असून नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्र (अल्प परिचय) दर्शविणारा फलक लावण्यात आले.
यावेळी उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, शहर अभियंता ईश्वरनंदा पनपालिया, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, महानगरपालिकेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, संजय दारव्हेकर, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, विजय आवारे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभुषेत सर्जेराव गलपट यावेळी उपस्थित होते. या जयंती निमित्य अभिनेता सर्जेराव गलपट यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारीत गीत सादरीकरण केले.