LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

लाडकी बहीण योजनेचा लाभ बांगलादेशी घुसखोर महिलेने घेतल्याचा धक्कादायक खुलासा

     लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरु केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली. 'लाडकी बहीण योजने'चा मोठा फायदा महायुतीला झाला आणि ऐतिहासिक विजयासहीत महायुतीने राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर या योजनेमधील नियम आणि अटींवर बोट ठेवत अनेक अपात्र महिलांना नावं मागे घेण्यास सांगण्यात आलं. या योजनांमध्ये नियम अटी असतानाही अनेक अपात्र महिलांनी त्याचा लाभ घेतल्याचं दिसून आलं. यातच आता एका नवीन गोंधळाची भर पडली आहे. अभिनेता सैफ अली खानवर एका बांगलादेशी चोराने हल्ला केल्याची माहिती समोर आल्यानंतर बांगलादेशी घुसखोरांवरुन चर्चा सुरु असतानाच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ बांगलादेशी घुसखोर महिलेने घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेकायदेशीररित्या भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी महिलेने मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

कुठे आणि कशी झाली कारवाई?
क्राइम इंटेलिजेंस युनिट (सीआययू) ने बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना मुंबईतील कामठीपुरा येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. महादेव यादव या 34 वर्षीय भारतीयालाही या बांगलादेशी व्यक्तींना आश्रय देणे आणि रसद पुरवण्याचा ठपका ठेवत अटक केली आहे. बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर स्थलांतर करण्यास मदत केल्याबद्दल महादेव यादवला अटक करण्यात आली आहे. पकडलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एका महिलेचं नाव उर्मिला खातुन असं असून ती 23 वर्षांची आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उर्मिला खातुनला 1500 रुपयांचे दोन हप्ते मिळाले होते, अशी माहिती समोर आली आहे.

वकील म्हणतो, 'लाडकी बहीणचा लाभ मिळाला म्हणजे ती भारतीयच'
मुंबई पोलिसांनी या बांगलादेशी महिलेचे आधारकार्ड बनावट असल्याचा दावा केला आहे. मात्र या महिलेचे वकील सुनील पांडे यांनी उलट प्रतिक्रिया नोंदवताना, या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला मिळाले यावरून ती भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध होते," असा दावा केला आहे. अटक करण्यात आलेल्या मोहम्मद ओसिकुर रहमान उर्फ झियादली शद्दर या बांगलादेशी नागरिकाला भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल अटक करण्यात आल्याची पूर्वीचीही नोंद आहे. कायदेशीर कारवाईनंतर त्याला भारतीय यंत्रणांनी त्याला बांगलादेशात पाठवलं होतं. मात्र 2014 मध्ये मोहम्मद ओसिकुर रहमान पुन्हा भारतात आला.

महिलांची तस्करी
अटक करण्यात आलेल्या इतर बांगलादेशी नागरिकांची ओळखही पटली आहे. अटकेत असलेल्या बांगलादेशींची नावं जलाल शेख (28), अलीम रसूल अली (23) आणि मोहम्मद ओसिकुर रहमान अशी आहेत. रहमानने बांगलादेशातून मुंबईत तरुणी आणि महिलांची तस्करी केल्याचं, पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहिता 2023, पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा, 1950, परदेशी कायदा, 1946 आणि परदेशी आदेश, 1948 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तीन ठिकाणीही शोधमोहीम आणि कारवाई
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट तीनने खेतवाडी येथून आणखी चार बांगलादेशी नागरिक आणि एका साथीदाराला अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर जोगेश्वरी, कांदिवली आणि नवी मुंबई येथे शोधमोहीम राबवण्यात आली. या शोध मोहिमेमध्ये चार बांगलादेशी नागरिक आणि एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेण्यात आले.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!