LIVE STREAM

AmravatiLatest NewsLocal News

विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सी.ए. पुष्कर देशपांडे, ननसा संचालक डॉ. अजय लाड तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!