सार्वजनिक विभागाद्वारे असांसर्गिक रोग बाबत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

दिनांक २०/०१/२०२५ ते दिनांक २२/०१/२०२५ या कालावधीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, अमरावती द्वारे असांसर्गिक रोग (Non Communicable Disease) NCD बाबत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रशिक्षण कार्यशाळे अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी शहरी आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी आयुष्यमान आरोग्य वर्धीनी केंद्र (HWC) वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर इंचार्ज तसेच अधिपारिचारीका (PHN) स्टॉफ नर्स, आरोग्य सेविका (ANM), बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (LT), औषधी निर्माण अधिकारी व आशा सेविका यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यशाळेला डॉ.भारद्वाज मुख्यसमन्वयक असांसर्गिक रोग कार्यक्रम महाराष्ट्र राज्य यांनी प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन डॉ.विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, अमरावती यांनी केले. या प्रसंगी डॉ.भारद्वाज, डॉ.मंगेश गुर्जर NCO जिल्हा समन्वयक, प्राचार्य आरोग्य कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र जिल्हा क्षय रुग्णालय परिसर तसेच डॉ.मुंद्रे, डॉ.संदिप पाटबागे उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत वय वर्ष ३० वरील सर्व नागरिकांची असांसर्गिक रोग निदान करणे, तपासणी करणे व औषधोपचार इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाअंतर्गत अमरावती सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत कार्यरत एकुण १३ शहरी आरोग्य केंद्र, १२ आरोग्य वर्धिनी केंद्र व १२ मनपा दवाखाना या ठिकाणी असांसर्गिक रोग मुखत: उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, स्तन कर्करोग व स्त्रियांमधील गर्भाशय मुख कर्करोग याबाबत तपासणी, निदान औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर सर्व बाबी मोफत होणार आहे. तरी सर्व अमरावतीकर ३० वर्ष वयावरील नागरिकांनी मनपा शहरी आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्र व मनपा दवाखाने या ठिकाणी जावुन आपली तपासणी करावी असे आवाहन डॉ.विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, अमरावती यांनी केले आहे.
असांसर्गिक रोग निदान कार्यक्रम (NCD) अंतर्गत वय ३० वर्ष नागरिकांनी रक्तदाब तपासणी (B.P.), रक्तशर्करा तपासणी (Diabetes) व कर्करोग (स्त्रीयांची स्तन व गर्भाचे मुख तपासणी) इत्यादी तपासणी मनपा शहरी आरोग्य केंद्र, मनपा दवाखाने व शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे विनामुल्य दैनंदिन स्तरावर सुरु आहेत तसेच या संबंधी औषधोपचार विनामुल्य पुरविला जातो. या सर्व तपासणी वय ३० वर्ष नागरिकांनी मनपा शहरी आरोग्य केंद्र, मनपा दवाखाने व शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे जावून सदर रोगाची तपासणी करावी असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.