अमरावती मधील ह्यूमन्स ऑफ अमरावती व स्वराज्य फाउंडेशन संस्थेने गाईला रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावायचा घेतला पुढाकार

कठोरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील ह्यूमन्स ऑफ अमरावती आणी स्वराज्य फाउंडेशन संस्थेने तीन दिवसांमध्ये रस्त्यांवरच्या गाईंना 242 रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावले . व तसेच कॉलनी परिसरा मधील , गाईंना अपघाता पासून वाचवण्या साठी रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावून देण्यात पुढाकार घेतला आहे. रस्ता अपघात तसेच इतर कारणांमुळे झालेल्या प्राण्यांसाठी मदत तसेच आधुनिक उपचार पद्धतीची सोय उपलब्ध करून दिली आहे. प्रशिक्षणासाठी संस्थेने अनेक प्रकल्प हाती घेतले आहे. शेतीकामी उपयोगी न पडणाऱ्या गायांना व अपंग असलेल्या गाई गाई मालकांनी रस्त्यावर सोडले आहे. हा संगोपनाचा खूप मोठा प्रश्न आहे. अशा प्राण्यांवर लोकांचे दुर्लक्ष होत आहे. व रोज देखील करोडो गाय व इतर प्राणी रस्ता अपघाताने मारल्या जात आहे. प्राण्यांचा रस्ता अपघात होऊ नये म्हणून ह्यूमन्स ऑफ अमरावती संस्थेचे प्रमुख ओजस इंगोले , जय गिरनाळे व स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख श्रेयांश म्हाला आणि अर्थव देशमुख यांनी गाईंना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्यात पुढाकार घेतला. व आतापर्यंत यांच्या टीमने अमरावती परिसरामधील दस्तूर नगर, रहाटगाव, नागपूर हायवे, कठोरा रोड , शेगाव नाका, बडनेरा, या परिसरामध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये गाईंना 242 रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावून दिले. व तुम्ही सुद्धा तुमच्या परिसरात मध्ये मोकाट गाई फिरत असेल तर त्या गाईनला रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावून द्यावे जेणेकरून त्यांचे संरक्षण देखील होईल व रस्ता अपघातामध्ये गाईंची बळी जाणार नाही. असे ह्युमन ऑफ अमरावती आणि स्वराज्य फाउंडेशन संस्थेचे आव्हान आहे.