Amaravti GraminLatest News
धारणी शहरात अस्वल असल्याच्या चर्चेने खळबळ
"धारणी शहरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराला लागून असलेल्या काही रहिवासी भागांमध्ये अस्वल असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाची टीम अलर्ट झाली असून,
धारणी शहरालगतच्या सिताराम नगरी, नीता नगर, तसेच कालीमाता मंदिर परिसरात अस्वल असल्याची चर्चा सध्या सर्वत्र पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरीक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने पथक तयार केले असून, पिंजऱ्यांसह संपूर्ण परिसरात गस्त लावली आहे.
रात्रभर गस्त घालूनही अद्याप अस्वलाचा ठावठिकाणा लागत नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, काही कुत्र्यांना जखमी अवस्थेत आढळून आल्याने परिसरातील नागरिक अधिक चिंतेत आहेत.
संपूर्ण विभागातील वन अधिकाऱ्यांसह फॉरेस्ट गार्ड आणि वनरक्षक सतर्क आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मॉर्निंग किंवा ईव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
“अस्वल असल्याच्या चर्चेमुळे धारणी शहरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. वन विभागाने पिंजऱ्यांसह पूर्ण तयारी केली असून, अस्वल पकडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.